अकलूज नगरपरिषद निवडणुकीत विश्वतेजसिंह मोहिते पाटील प्रचार मैदानात…!

अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत मोहिते-पाटील घराण्याच्या युवा पिढीने जोरदार एन्ट्री केली आहे.”अजातशत्रू” नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नातू आणि आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव विश्वतेजसिंह मोहिते-पाटील हे त्यांच्या सुविद्य पत्नीसह प्रचारात सक्रिय झाले आहेत.
युवा नेतृत्वाच्या या सक्रिय सहभागाने निवडणुकीच्या वातावरणात उत्साह संचारला आहे.
विश्वतेजसिंह मोहिते-पाटील यांनी प्रामुख्याने प्रभाग क्रमांक ३ मध्ये महादेव नगर येथे आपला मोर्चा वळवला आहे…
या प्रभागातून निवडणूक लढवणारे उमेदवार नम्रता जगताप आणि विशाल मोरे यांच्यासाठी त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
त्यांनी येथील मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यावर आणि वैयक्तिक संपर्कावर विशेष भर दिल्याचे दिसून आले.
युवा नेतृत्वाच्या या थेट भेटीगाठीमुळे उमेदवारांच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून, मतदारांमध्येही सकारात्मक प्रतिसाद उमटताना दिसत आहे.
या वेळी नाझीम खान,दिपक शिंदे,वैष्णवी रिसवडकर,शुकुर सोलापूरे यांच्या सह येथील बहुसंख्य मतदार बंधू भगिनी उपस्थित होत्या…

